गाझीनगरला घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:55+5:302021-04-02T04:21:55+5:30
------------- कृषी पंपासह केबलची चोरी अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी सोलर मोटार व केबलची चोरी करून ...

गाझीनगरला घरफोडी
-------------
कृषी पंपासह केबलची चोरी
अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी सोलर मोटार व केबलची चोरी करून २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नंदकुमार काळू गायकवाड (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांच्या शेतात असलेली सोलार मोटर व केबल ३० ते ३१ मार्च दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
----------
दुचाकीची चोरी
अहमदनगर : निर्मलनगर भागातील भगवान बाबा चौकातून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद साहेबराव रघुनाथ वाखारे (रा. निर्मलनगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे. ३० मार्च रोजी रात्री आठ वाजता त्यांची भगवान बाबा चौकातील सत्कार कॉलनी परिसरात लावलेली दहा हजार रुपये किमतीची दुचाकी (एम. एच. १७, एएम ६८९६) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.