घरफोडी करून पैसे, दागिने चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST2021-03-18T04:20:56+5:302021-03-18T04:20:56+5:30

बंद घर फोडून चोरी अहमदनगर : जामखेड तालुक्यातील राजुरी येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे ...

The burglars stole money and jewelery | घरफोडी करून पैसे, दागिने चोरले

घरफोडी करून पैसे, दागिने चोरले

बंद घर फोडून चोरी

अहमदनगर : जामखेड तालुक्यातील राजुरी येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. १६ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अभिषेक ज्ञानदेव राळेभात यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेळ्या चोरल्या

अहमदनगर : नगर तालुक्यातील भोयरेपठार येथून चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या चोरून नेल्या. १५ ते १६ मार्चदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात रत्नकुमारी बाळू टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: The burglars stole money and jewelery