घरफोडी करून पैसे, दागिने चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:25 IST2021-03-01T04:25:05+5:302021-03-01T04:25:05+5:30
बाजारातून चोरला मोबाइल अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील आठवडे बाजारातून चोरट्याने ७ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून ...

घरफोडी करून पैसे, दागिने चोरले
बाजारातून चोरला मोबाइल
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील आठवडे बाजारातून चोरट्याने ७ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. १६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी शिवाजी नारायण वाळुज यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक मोढवे हे पुढील तपास करत आहेत.
बस स्टेशनमधून ऑइल चोरले
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील महापारेषण कंपनीच्या सबस्टेशनमधून चोरट्यांनी १३ हजार २०० रुपये किमतीचे ऑइल चोरून नेले. २७ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात संतोश दुंडप्पा मुरदंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल हनुमंत जाधव (रा.वडारवस्ती सिद्धटेक ता.कर्जत) व एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.