श्रीगोंदा शहरात घरफोड्या : दागिन्यांसह मोटारसायकलींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 10:45 IST2018-06-09T10:41:32+5:302018-06-09T10:45:24+5:30

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीगोंदा शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला. हनुमान नगरमधील दुर्योधन वडेकर यांच्या घराचे कुलुप तोडून १० तोळे सोने व २० हजाराची रोकड लंपास केली.

Burglars in Shrigonda: Motorcycles with jewelery | श्रीगोंदा शहरात घरफोड्या : दागिन्यांसह मोटारसायकलींची चोरी

श्रीगोंदा शहरात घरफोड्या : दागिन्यांसह मोटारसायकलींची चोरी

श्रीगोंदा : शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीगोंदा शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला. हनुमान नगरमधील दुर्योधन वडेकर यांच्या घराचे कुलुप तोडून १० तोळे सोने व २० हजाराची रोकड लंपास केली. बालाजीनगर परिसरातील सुदाम खेंडके व शिवाजी भोस यांची मोटारसायकल चोरीस गेली. घटनास्थळास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी भेट दिली.
दुर्योधन वडेकर व त्यांची पत्नी हे शेतात मुक्कामासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा तोळे सोने व २० हजार रोख रक्कमेवर डल्ला मारला. सुदाम खेंडके यांच्या बंगल्याचे गेटचे कुलूप कटरने तोडले आणि मोटारसायकल चोरून नेली. शिवाजी भोस यांची यांचीही मोटारसायकल चोरून नेली.मात्र भोस यांची मोटारसायकल शहरात सापडली. काँग्रेस चे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांच्या बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Burglars in Shrigonda: Motorcycles with jewelery