शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मानलं! पैशांची चणचण, पत्नी दवाखान्यात; तरीही साईदरबारी सापडलेले पैशांचे बंडल केले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:53 IST

साईबाबांच्या शिकवणीची साक्ष देणारी ही घटना, आजही जगात माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती देते.

Shirdi Sai Baba Mandir: पत्नीच्या उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून तिला शिर्डी संस्थानच्या दवाखान्यात उपचारासाठी घेऊन आला. शिर्डीत साई दरबारी सापडलेले चौदा हजारांच्या नोटांचे बंडल यत्किंचितही लोभ न धरता संस्थानात जमा केले. स्वतः संकटात असलेल्या या गरीब भाविकाने घडविलेल्या माणुसकीच्या श्रीमंतीचे दर्शन चर्चेचा विषय बनले आहे.

जालना जिल्ह्यातील केंदली येथील रहिवासी गजानन सव्वाराव म्हस्के, एक अपंग व्यक्ती, ज्यांचे जीवन मोलमजुरी करून चालते. पैशांची चणचण असल्याने, पत्नीच्या उपचारासाठी ते शिर्डीच्या संस्थान रुग्णालयात आले. पत्नीच्या पोटाच्या आजारावर उपचार सुरू असताना, साईबाबांचे दर्शन घेऊन द्वारकामाई मंदिरातून बाहेर पडताना त्यांना सापडलेले १४ हजार रुपयांचे बंडल त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे सोपवले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्याकडे नेले.

योगायोगाने, माजी नगराध्यक्ष नीलेश कोते आणि श्रीरामनवमी यात्रा समितीचे अध्यक्ष दीपक वारुळे हे माळी यांच्याकडे उपस्थित होते. गजानन यांची परिस्थिती जाणून, सर्वांना त्यांच्या प्रामाणिकपणाचा अनुभव आला. साईबाबांच्या शिकवणीची साक्ष देणारी ही घटना, आजही जगात माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती देते.

गजाननचे केले कौतुक'गरिबी अव्वल बादशाही, अमीरीसे लाख सवाई' हे साईबाबांचे शब्द गजानन यांच्या कृतीतून पुन्हा एकदा खरे ठरले. या घटनेने उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे मन भरून आले. माजी नगराध्यक्ष नीलेश कोते आणि श्रीरामनवमी यात्रा समितीचे अध्यक्ष दीपक वारुळे यांनी गजानन यांचा सत्कार करत त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

टॅग्स :shirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिरAhilyanagarअहिल्यानगर