बुुलेट चोरणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:43 IST2019-03-06T18:43:12+5:302019-03-06T18:43:45+5:30

कोपरगाव परिसरातून बुलेट मोटारसायकली चोरून बीड परिसरात विक्री करणारी चौघांची टोळी मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली़

Bullet-stealing gang rivalry | बुुलेट चोरणारी टोळी जेरबंद

बुुलेट चोरणारी टोळी जेरबंद

अहमदनगर: कोपरगाव परिसरातून बुलेट मोटारसायकली चोरून बीड परिसरात विक्री करणारी चौघांची टोळी मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली़
निलेश अर्जुन दवंगे (वय २१ रा़ कोपरगाव), नाना उर्फ परमेश्वर पंडितराव आघाव, (वय ३२ रा़ दौनापूर ता़ परळी जि़ बीड), बबन शंकर जाधव (वय २३ रा़ निंबुटा तांडा जि़ बीड) व किरण विलास गजलवार (वय २४ रा़ हिंगोली) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत़ ३१ जानेवारी रोजी कोपरगाव येथील माणिक बंडू सोमासे यांची बुलेट चोरीला गेली होती़ याप्रकरणी कोपरगाव पोलीसांनी रवी वाल्मिक चव्हाण (रा़ कोपरगाव) याला अटक केली होती चव्हाण याने त्याचा साथीदार निलेश दवंगे यांनी ही बुलेट चोरी होती़ या चोरलेल्या बुलेट हे बीड परिसरात असलेल्या त्यांच्या साथीदारांकडे देत होते़ या बुलेट हिंगोली, परळी, परभणी परिसरात विकत होते़ या टोळीच्या कार्यपद्धतीबाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार व कोपरगाव ठाण्याचे निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक गणेश इंगळे, पोलीस हेड कॉस्टेबल सोन्याबापू नानेकर, विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, रवी सोनटक्के, विजय ठोंबरे, बबन बेरड, आऱपी़ पुंडे, एस़जे़ आगरवाल, आऱसी़ कोतकर यांच्या पथकाने सर्व आरोपींना अटक केली़ या कारवाईत पोलीसांनी ८ लाख ५५ हजार रुपयांच्या ६ बुलेट जप्त केल्या आहेत़

Web Title: Bullet-stealing gang rivalry