घरकुलाचा निधी परत आणू

By Admin | Updated: August 17, 2014 00:03 IST2014-08-16T23:47:54+5:302014-08-17T00:03:46+5:30

कोपरगाव : घरकुल योजनेचा परत गेलेला सव्वाशे कोटीचा निधी पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले़

Bring back the fund from the house | घरकुलाचा निधी परत आणू

घरकुलाचा निधी परत आणू

कोपरगाव : शहर विकासासाठी आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र आलो़ या शहराची ओंगळ प्रतिमा पुसून घरकुल योजनेचा परत गेलेला सव्वाशे कोटीचा निधी पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले़
४० कोटी रूपये खर्चाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला़ अध्यक्षस्थानी कोसाकाचे माजी उपाध्यक्ष छबूराव आव्हाड होते़ यावेळी शहरातील मुख्य रस्त्याचे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर नामकरण फलकाचे अनावरण युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले़ प्रारंभी नगराध्यक्ष ऐश्वर्याताई सातभाई यांनी प्रास्ताविक केले़ गटनेते डॉ़ अजेय गर्जे यांनी योजनेची माहिती दिली़ कार्यक्रमास बाजीरावर वरकड, माजी नगराध्यक्षा सुरेखा राक्षे, दिलीप दारूणकर, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते़
आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहर विकासासाठी आम्ही सहमती एक्सप्रेस केली असून नगरसेवकांनी चुकीच्या कामांऐवजी तांत्रिकदृष्ट्या बरोबर असलेल्या कामांना पाठिंबा द्यावा़ कोपरगावच्या विकासासाठी साईबाबा जन्मशताब्दी सोहळ्यासाठी येणाऱ्या केंद्रीय योजनांमधून निधी आणू़
बिपीन कोल्हे पुढे म्हणाले, कोपरगाव शहराच्या नव्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव माजी आयुक्त सीताराम कुंटे हे पाणी पुरवठा विभागाचे सचिव असताना देवुन तो तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्यामार्फत मंजूर केला़ सन २०४५ पर्यंत वाढणारी लोकसंख्या गृहित धरून योजनेचा आराखडा केल्याचे कोल्हे म्हणाले. .
विस्तापित टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बाजारतळावर १३३ गाळे कामाचे लवकरच भूमिपूजन होणार आहे़ सहकारात आम्ही एक होतो, तसं नगर पालिकेत ही मंडळी एकत्र का होत नाही, म्हणून आमच्यावर टिका व्हायची़ मात्र आम्ही आता त्याला पूर्णविराम दिला आहे़ नगरसेविका सपना मोरे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)

Web Title: Bring back the fund from the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.