लाचखोर अभियंता लोखंडेस अटक

By Admin | Updated: June 28, 2017 18:34 IST2017-06-28T18:34:03+5:302017-06-28T18:34:03+5:30

जलशुद्धीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे केलेल्या कामाचे थकीत बिल काढण्याच्या बदल्यात ४० हजार रुपयांची मागणी केली होती.

The bribe engineer is arrested by Lokhande | लाचखोर अभियंता लोखंडेस अटक

लाचखोर अभियंता लोखंडेस अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रकाश लोखंडे यांना २० हजार रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री रंगेहाथ पकडले. या कारवाईने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोखंडे यांनी नगरपालिकेच्या जलशुद्धीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे केलेल्या कामाचे थकीत बिल काढण्याच्या बदल्यात ४० हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच नवीन ठेकेदार येईपर्यंत कामाची मुदतवाढ दिल्याच्या बदल्यात वेगळ्या रक्कमेची मागणी केली होती. अनेक महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराचे बिल पालिका प्रशासनाने न दिल्याने वैतागलेल्या ठेकेदाराने अखेर लोखंडे बेकायदा पैसे मागत असल्याची तक्रार नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. ठेकेदाराच्या तक्रारीवरून नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, डी.टी.धोंडे,पोलीस हवालदार शांताराम नाठे,अमोल निकुंभ,चालक परशुराम जाधव यांनी सापळा रचून मंगळवार २७ जूनला संध्याकाळी ८ वाजेच्या सुमारास कोपरगाव जवळील पुणतांबा चौफुली येथे ठेकेदाराकडून अभियंता लोखंडे यांना २० हजार रुपये घेऊन बॅगेत ठेवताच छापा टाकून रंगेहाथ पकडले.
लोखंडे यांनी लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस निरीक्षक डी.टी.धोंडे करीत आहेत.

          जीवन प्राधिकरणाऐवजी जेलमध्ये
अभियंता प्रकाश लोखंडे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नुकतीच बदली झाली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला नवीन अभियंता येईपर्यंत लोखंडे यांना काम करण्याची विनंती पालिका प्रशासनाने केली होती. आता लोखंडे यांना जीवन प्राधिकरणात जाण्याऐवजी जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. लोखंडे यांनी ठेकेदाराकडून मागणी केलेल्या पैशाचे अजून किती भागीदार आहेत? याची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत.

Web Title: The bribe engineer is arrested by Lokhande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.