ब्राम्हणी गाव दहा दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:20 IST2021-04-17T04:20:17+5:302021-04-17T04:20:17+5:30
दहा दिवसादरम्यान कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य दुकाने दूध संकलन केंद्र यांना वेळ ठरवून देण्यात आली आहे. या कालावधीत दारू, ...

ब्राम्हणी गाव दहा दिवस बंद
दहा दिवसादरम्यान कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य दुकाने दूध संकलन केंद्र यांना वेळ ठरवून देण्यात आली आहे.
या कालावधीत दारू, मावा, गुटखा विक्री करताना कोणी आढळल्यास ५ हजार रुपये दंड केला जाणार आहे. तो न भरल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या उताऱ्यावर बोजा चढविण्यात येणार आहे. या शिवाय त्या व्यक्ती विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार आहेत. १० दिवसा बंदच्या काळात भाजीपाला-फळे विक्री, किराणा दुकाने, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक दुकाने पूर्णपणे बंद राहतील.
दूध संकलन केंद्र- सकाळी सहा ते आठ व सायंकाळी ६ ते ८, पशुखाद्य व कृषी सेवा केंद्र - दुपारी १२ ते २,
गावात वावरताना कोणी विनामास्क दिसल्यास ५०० रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विनाकारण गावात येण्याचा व बसण्याचा प्रयत्न केल्यास जमाबंदी कलम १४४ नुसार दंडास व शिक्षेस पात्र राहील असे निर्देश ग्रामपंचायत बाम्हणी कोरोना प्रतिबंधात्मक समितीने दिले आहे.