ग्रामसेवक मारहाणप्रकरणी कामावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:22+5:302021-07-14T04:24:22+5:30

याबाबत सोमवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन धाडगे यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना तत्काळ अटक करून कडक कारवाई करावी, ...

Boycott at work in Gramsevak assault case | ग्रामसेवक मारहाणप्रकरणी कामावर बहिष्कार

ग्रामसेवक मारहाणप्रकरणी कामावर बहिष्कार

याबाबत सोमवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन धाडगे यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना तत्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी नगर तालुका पंचायत समिती येथे होणाऱ्या सभेवर सामूहिक बहिष्कार टाकतील. ग्रामपंचायतीचे कोणतेही कामकाज करणार नाहीत, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी ग्रामसेवक संघटना डीएनई १३६चे अध्यक्ष शहाजी नरसाळे, कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सूर्यभान सौदागर, ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष अशोक जगदाळे, दीपा राजळे, अंजुम शेख, कारखिले, मनीषा सुडके, कविता आडेप, विलास शेळके, ज्ञानेश्वर आडसुरे, पोपट रासकर, मंगेश पुंड, भास्कर सिनारे, शरद पिंपळे, अशोक बोरूडे, अरविंद शेळके आदी उपस्थित होते.

---------

फोटो - १२ग्रामसेवक निवेदन

घोसपुरी येथील ग्रामसेविका मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन धाडगे यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Boycott at work in Gramsevak assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.