सहदेव राऊत आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:41 IST2020-07-10T16:39:28+5:302020-07-10T16:41:38+5:30
कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील सहदेव रामचंद्र राऊत यांनी गुरूवारी (दि.९ जुलै) आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल चापडगाव येथील दोघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

सहदेव राऊत आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक
मिरजगाव : कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील सहदेव रामचंद्र राऊत यांनी गुरूवारी (दि.९ जुलै) आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल चापडगाव येथील दोघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.
कर्जत पोलीस स्टेशनमध्ये भारत श्रीरंग राऊत (रा.चापडगाव) यांच्या फिर्यादीनुसार सतीश लक्ष्मण निंबाळकर व पांडुरंग निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन या दोघांनाही अटक केली आहे. रविवारपर्र्यत त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
बुधवारी (८ जुलै) रात्री दहाच्या सुमारास सहदेव राऊत याने चापडगाव येथील सतीश लक्ष्मण निबांळकर यांच्या हॉटेलमध्ये जाऊन दारू पिण्यासाठी मागितली. यावेळी त्याला सतिश लक्ष्मण निंबाळकर व पांडुरंग सदाशिव निंबाळकर या दोघांनी मारहाण केली. या मारहाण केल्याचा अपमान सहन न झाल्याने सहदेव याने गुरूवारी घराच्या पडवीमधील लोखंडी पाईपाला दोरीने गळफास आत्महत्या केली, असे या फिर्यादीत म्हटले आहे.