बोटा : घारगाव परिसरातील नाशिक पुणे महामार्गाच्या खिंडीतील वळणावर रस्त्यालगतच्या डोंगरकडांना तडे गेल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:16 IST2017-10-03T16:15:24+5:302017-10-03T16:16:53+5:30
बोटा : घारगाव परिसरातील नाशिक पुणे महामार्गाच्या खिंडीतील वळणावर रस्त्यालगतच्या डोंगरकडांना तडे गेल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे.

बोटा : घारगाव परिसरातील नाशिक पुणे महामार्गाच्या खिंडीतील वळणावर रस्त्यालगतच्या डोंगरकडांना तडे गेल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे.
बोटा : घारगाव परिसरातील नाशिक पुणे महामार्गाच्या खिंडीतील वळणावर रस्त्यालगतच्या डोंगरकडांना तडे गेल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना त्वरित करण्याची गरज आहे.
नाशिक पुणे महामार्गावरील खेड ते सिन्नर दरम्यान रस्ता चौपदरीकरण कामात घारगाव परिसरात खिंडीत डोंगर फोडून रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी येथून वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान या खिंडीतील वळणावर रस्त्याच्या कडेला असणाºया डोंगराच्या कडांना रस्ता तयार करताना गेलेले तडे अजूनही कायम आहेत. वाहनचालक व प्रसारमाध्यमांनी याबाबत लक्ष वेधून घेतले. मात्र रस्ते बांधणी कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. हे कडे कोसळल्यास ते रस्त्यावर येऊन अपघाताचा धोका होऊ शकतो. त्यामुळे त्वरित हे धोकादायक कडे काढण्याची गरज आहे.
............................................
फोटो ०३ घारगाव खिंड
ओळ: नाशिक पुणे महामार्गावरील घारगाव खिंडीतील धोकादायक कडे.