राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बोरा-चोपडांमध्ये लढत

By Admin | Updated: May 22, 2016 00:17 IST2016-05-22T00:11:39+5:302016-05-22T00:17:03+5:30

अहमदनगर : अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स (नवी दिल्ली) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नगर येथील अशोक उर्फ बाबुशेठ बोरा आणि नाशिक येथील मोहनलाल चोपडा यांच्यात थेट लढत होत आहे.

In the Bora-Chopra contest for the president of the National President | राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बोरा-चोपडांमध्ये लढत

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बोरा-चोपडांमध्ये लढत

अहमदनगर : अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स (नवी दिल्ली) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नगर येथील अशोक उर्फ बाबुशेठ बोरा आणि नाशिक येथील मोहनलाल चोपडा यांच्यात थेट लढत होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष, प्रांताध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य अशा एकूण २६ जागांसाठी ५३ उमेदवार मैदानात असून रविवारी नगर येथीस बडीसाजन ओसवाल मंगल कार्यालयात सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे़ नगर आणि नाशिक अशा दोन केंद्रावर मतदान होणार आहे. नगर येथे बडीसाजन ओसवाल मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होवून निकाल घोषित होणार आहे. नगर येथील मतदान केंद्रावर राज्यातील १८ जिल्ह्यातून ८ हजार ५६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती प्रांतीय निवडणूक अधिकारी अ‍ॅड. डी. डी. खाबिया आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण भंडारी यांनी ‘लोकमत’ला दिली.
जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये अशोक उर्फ बाबुशेठ सिमरतमल बोरा (नगर) आणि मोहनलाल चोपडा (नाशिक) यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २४ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणुकीसाठी अशोक बोरा यांच्या नेतृत्त्वाखाली परिवर्तन पॅनल, तर मोहनलाल चोपडा यांच्या नेतृत्त्वाखाली जय जिनेंद्र ग्रुप निवडणूक लढवित आहे. अठरा जिल्ह्यातून मतदार येणार असल्याने मतदान केंद्रावर मोठी गर्दी होणार आहे़ अखिल जैन समाजाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे़
(प्रतिनिधी)
प्रांतीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नगरचे लोढा
प्रांतीय अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी सतीश नारायणदास लोढा (नगर) आणि सुभाष बाबुलाल घिया जैन (नाशिक) यांच्यात लढत होत आहे.
बोरा यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये कार्यकारिणी सदस्यासाठी नगरचे अजय बोरा,पियुष लुकंड, अनिल कटारिया, धनराज संचेती, नंदलाल कोठारी, सुनील बाफना यांचा समावेश आहे.
चोपडा यांच्या जय जिनेंद्र पॅनलमध्ये नगर येथील चंदनमल डोशी (संगमनेर), सतीश चोपडा, मनोज सेठिया, सुभाष पगारिया, वैभव नहार (नेवासा) यांचा समावेश आहे.

Web Title: In the Bora-Chopra contest for the president of the National President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.