बोलक्या बाहुल्यासंगे रमली बच्चे कंपनी
By Admin | Updated: July 16, 2014 00:44 IST2014-07-15T23:28:32+5:302014-07-16T00:44:50+5:30
अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच आयोजित बोलक्या बाहुल्या संगे पपेट शो रविवारी येथील सहकार सभागृहात दुपारी पार पडला. शालेय विद्यार्थांसाठी कार्यक्रमाचे मोफत आयोजन केले होते.
बोलक्या बाहुल्यासंगे रमली बच्चे कंपनी
अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच आयोजित बोलक्या बाहुल्या संगे पपेट शो रविवारी येथील सहकार सभागृहात दुपारी पार पडला. शालेय विद्यार्थांसाठी कार्यक्रमाचे मोफत आयोजन केले होते.
लहान वयातच दप्तराचे ओझे, गृहपाठाचा न संपणारा पाढा आणि त्यातच क्लासच्या अभ्यासाची पडलेली भर अशा वातावरणात कोमेजून जाणाऱ्या बालमनाला फुलवण्याची संधी सत्यजित पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली. यावेळी विविध पपेटची प्रात्यक्षिके पाहून मुले आनंदित झाली आणि आगळावेगळा कार्यक्रम पाहण्याची संधी मुलांना लाभली. नगरमध्ये प्रथमच या सुंदर, आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाहुल्यांच्या आवाजात मुलांशी संवाद साधताना लोकमत बालविकास मंचमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे पाध्ये यांनी सांगितले.
प्रारंभी लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमास सुरूवात झाली.
लोकमतच्या वतीने शब्दभ्रमकार सत्यजित पाध्ये, वाघ नर्सिंग होमचे डॉ. सागर वाघ, मृणाल वाघ, आ. अनिल राठोड, विक्रम राठोड युवा मंचचे विक्रम राठोड, साईदीप एक्झिक्युटीव्हच्या संचालिका प्रिया भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर संस्कारमोती स्पर्धेचा विजेता प्रसाद भालचंद्र साळवे याला नुकतीच लोकमततर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात विविध कलाविष्कार सादर करणारे सभासद समीक्षा शिंदे, गणेश चाफे, निखिल घोडके, खुशी बोरा, बीट ब्रेकर्स ग्रुपचे अनिकेत फुंदे, ओंकार व्यवहारे यांचे स्वागत केले. यावेळी लोकमतच्या उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या डॉ. हेमा राजेंद्र सेलोत, बबिता गांधी, स्मिता बकरे, शुभांगी बंगाळे, भावना केदार, स्वप्निल अनपट, नंदकुमार चिखले, श्रीदेवी अरगोंदा, संगीता सोनेकर, शैलेश गवळी, अलका मुंदडा, बबनराव मेहेत्रे यांचे भेटवस्तू देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. सागर वाघ यांनी बालकांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.
विक्रम राठोड यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी वाघ नर्सिंग होम, विक्रम भैया राठोड युवामंच व साईदीप एक्झिक्युटीव्ह यांनी प्रायोजकत्व दिले. सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले. (प्रतिनिधी)