आंबीखालसामधून बोलेरो कारची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 19:46 IST2019-07-10T19:46:18+5:302019-07-10T19:46:23+5:30

नाशिक - पुणे महामार्गालगत आंबी खालसाच्या (ता.संगमनेर) प्रभाकरनगर परिसरात घरासमोर पार्क केलेली बोलेरो कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

Bolero Car Theft From Ambikalasa | आंबीखालसामधून बोलेरो कारची चोरी

आंबीखालसामधून बोलेरो कारची चोरी

घारगाव : नाशिक - पुणे महामार्गालगत आंबी खालसाच्या (ता.संगमनेर) प्रभाकरनगर परिसरात घरासमोर पार्क केलेली बोलेरो कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार बुधवारी (ता. १०) सकाळी उघडकीस आला. राजु पंढरीनाथ मोरे (वय ४५, रा.प्रभाकरनगर आंबी खालसा ता.संगमनेर) यांनी याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून गेल्या महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे.पोलिसांनी तपास सुरू केला आहे.मोठ्या वाहनांचीही चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये वाहन चोरट्यांची धास्ती निर्माण झाली आहे.
नाशिक-पुणे महामार्गालगत आंबी खालसा येथे मंगळवारी रात्री राजु मोरे यांच्या घरासमोर त्यांच्या मालकीची बोलेरो कार (क्रमांक एम. एच. १६ ए. टी. ०५१४) चोरट्याने बनावट किल्लीच्या मदतीने लांबवली. बुधवारी पहाटे चार वाजून पन्नास मिनीटांनी हा प्रकार घडला. घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एस.एम.विखे करत आहे. दरम्यान , २० दिवसांपूवीर्ही याच ठिकाणाहून दिनकर गाडेकर यांची बोलेरो चोरीस गेली होती.

 

Web Title: Bolero Car Theft From Ambikalasa