विहिरीत आढळला तरुण, तरुणीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:47+5:302021-01-25T04:21:47+5:30
अजय सुरेश बडेकर (वय २३) व मानसी भीमा पाचारे (वय २२, दोघे रा. दरेवाडी) असे मयत तरुण, तरुणीचे नाव ...

विहिरीत आढळला तरुण, तरुणीचा मृतदेह
अजय सुरेश बडेकर (वय २३) व मानसी भीमा पाचारे (वय २२, दोघे रा. दरेवाडी) असे मयत तरुण, तरुणीचे नाव आहे. शनिवारी पहाटे दरेवाडी येथील वहिरीत तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला होता. याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक बेंडकोळी, सहायक उपनिरीक्षक मुळे, पोलीस नाईक राजू सुद्रिक, समीर शेख, काळे यांच्या पथकाने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान मयत तरुण, तरुणी एकाचवेळी गावातून गायब असल्याने मुलीच्या नातेवाइकांनी या घटनेच्या चौकशी मागणी करत अजय बडेकर याला अटक करण्याची मागणी केली. तरुणीचा मृतदेह आढळून आलेल्या विहिरीच्या काठावर एक टी शर्ट व पुरुषाच्या चपला आढळून आल्या. त्यामुळे मानसी हिच्यासोबत अजय यानेही आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी कॅमेऱ्याच्या सहायाने विहिरत मृतदेहाचा शोध घेतला मात्र मृतदेह आढळून आला नाही. अखेर दहा तासाच्या प्रयत्नानंतर वहिरीत अजय बडेकर याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.