बंधा-यातील पाण्यात आढळला तरुणाचा मृतदेह; नेवाशातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:30 IST2020-05-13T12:27:39+5:302020-05-13T12:30:07+5:30
नेवासा येथील मध्यमेश्वर मंदिराकडे जाणा-या रस्त्यावरील ओढ्यात शहरातील एका तरुणाचा मृतदेह पाण्यात आढळून आला आहे. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

बंधा-यातील पाण्यात आढळला तरुणाचा मृतदेह; नेवाशातील घटना
नेवासा : येथील मध्यमेश्वर मंदिराकडे जाणा-या रस्त्यावरील ओढ्यात शहरातील एका तरुणाचा मृतदेह पाण्यात आढळून आला आहे. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
नेवासा शहरातील मध्यमेश्वर बंधा-याजवळ असलेल्या ओढ्यात बुधवारी सकाळी १० वाजता एक मृतदेह तरंगताना स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना सदर घटनेची तत्काळ माहिती दिली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे, पोलीस हवालदार तुळशीराम गिते यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशात मोबाइल व आधारकार्ड आढळून आले. यावरुन त्याचे नाव हेमंत नंदकुमार कुसळकर (वय २०, रा.नेवासा) असे असल्याचे समजले. सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीराम गीते करीत आहेत.