अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:41+5:302021-02-05T06:42:41+5:30
घारगाव : संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे नाशिक पुणे महामार्गालगत खंदरमाळवाडीच्या हद्दीत बुधवारी सकाळी रस्त्यावर एक मृतदेह आढळून ...

अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
घारगाव : संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे नाशिक पुणे महामार्गालगत खंदरमाळवाडीच्या हद्दीत बुधवारी सकाळी रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा परिसरात खंदरमाळवाडीच्या हद्दीत एक अनोळखी ४५ ते ५० वर्षीय इसमाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली. घारगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील पाटील, राजू खेडकर, सुरेश टकले, संतोष खैरे, किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, कुंडलिक साळुंके आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
सदर मृतदेह हा अज्ञात व्यक्तीचा असून त्याच्या अंगात निळसर राखाडी रंगाची फूल पॅन्ट, शर्ट फिक्कट गुलाबी, प्लास्टिक काळी चप्पल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या डोक्याला व छातीला मार असून प्राथमिक अंदाजानुसार खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीचे ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आला.