प्रवरा नदीपात्रात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल छत्तीस तासानंतर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:26 IST2020-09-11T14:25:15+5:302020-09-11T14:26:29+5:30

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील बाळासाहेब धोंडीराम माळी (वय ५७ वर्षे) ही व्यक्ती गेल्या बुधवारी (दि.९ सप्टेंबर) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीपात्रात अंघोळीसाठी गेली असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती.

The body of a man who was swept away in the Pravara river found 36 hours later | प्रवरा नदीपात्रात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल छत्तीस तासानंतर सापडला

प्रवरा नदीपात्रात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल छत्तीस तासानंतर सापडला

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील बाळासाहेब धोंडीराम माळी (वय ५७ वर्षे) ही व्यक्ती गेल्या बुधवारी (दि.९ सप्टेंबर) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीपात्रात अंघोळीसाठी गेली असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. गेल्या दोन दिवसांपासून पाचेगावातील युवकांकडून नदीपात्रात शोधमोहीम सुरू होती. आज तब्बल छत्तीस तासानंतर या मोहिमेला यश आले असून शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान नेवासा येथील मध्यमेश्वर बंधाऱ्यात सदर व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पो कॉ. ज्ञानेश्वर देवकाते, इसमाचे नातेवाईक हजर होते.

Web Title: The body of a man who was swept away in the Pravara river found 36 hours later