१९ तासांनी तरुणाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:13 IST2019-05-11T17:11:59+5:302019-05-11T17:13:00+5:30
पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तलावात इ.१२ वीत शिकत असलेला महाविद्यालयीन तरुन अरबाज शौकत शेख (वय १८)पोहायला गेला असताना बुडून मरण पावला.

१९ तासांनी तरुणाचा मृतदेह सापडला
पळवे : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तलावात इ.१२ वीत शिकत असलेला महाविद्यालयीन तरुन अरबाज शौकत शेख (वय १८)पोहायला गेला असताना बुडून मरण पावला. रात्री उशिरा पर्यंत शोध कार्य सुरू होते. दुस-या दिवशी शनिवारी ११ वाजता तब्बल १९ तासांनी या तरूणाचा मृतदेह सापडला.
अरबाज हा तैयब शेख व रियान शेख या मित्रांसमवेत पोहायला गेला होता. अरबाज पोहत असताना त्याचे मित्र मोबाईल वर चित्रीकरण करत होते. अरबाज दुरवर पोहत गेल्याने दम लागला असावा त्यामुळे तो गटांगळ्या घेवून काही क्षणात दिसेनासा झाला. हि घटना सायंकाळी पाच च्या सुमारास घडली. सुपा पोलीस घटनास्थळी पोहचून शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू यश न आल्याने दुस-या दिवशी कुरुंद येथून पाणबुडी सह वीस खाजगी पोहणारे पथक पाचारण करून बोटीच्या व जाळी च्या साह्याने अरबाज चा मृतदेह सकाळी ११ वाजता पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजेंद्र भोसले सह मश्चिद्रं अडकित्ते, अक्तार शेख यांनी काम पाहीले. रात्री उशीरापर्यंत पारनेरचे तहसिलदार प्रविण चव्हाणके शोधकार्यात उपस्थित होते.