कौठा शिवारात २७ लाखाच्या बोटी जप्त
By | Updated: December 5, 2020 04:36 IST2020-12-05T04:36:05+5:302020-12-05T04:36:05+5:30
श्रीगोंदा : पोलिसांनी कौठा शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या २७ लाख रूपये किंमतीच्या तीन फायबर बोटी व ...

कौठा शिवारात २७ लाखाच्या बोटी जप्त
श्रीगोंदा : पोलिसांनी कौठा शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या २७ लाख रूपये किंमतीच्या तीन फायबर बोटी व तीन सेक्शन पंप जप्त केले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केली.
या प्रकरणी बाबुराव राजू पाटोळे (रा. नानवीज, ता. दौंड, जि. पुणे), सोनू व्यंकटेश बल्याळ (रा. शालीमार चौक, दौंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील काही वाळूचोर नगर जिल्हाहद्दीत येऊन वाळूचोरी करीत आहेत.
कौठा शिवारात भीमा नदीपात्रात तीन बोटी वाळू तस्करी करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना समजली. त्यांनी पोलीस यंत्रणा अलर्ट केली. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस काॅन्स्टेबल प्रताप देवकाते, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, रवी जाधव, राहुल अजबे यांनी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास भीमा नदी पात्रात ही कारवाई केली. यामध्ये बाबुराव पाटोळे यांच्या दोन तर सोनू बल्याळ यांची एक बोट आहे.
चौकट...
गौणखनिजाची विना परवाना उत्खनन, वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे गौणखनिज चोरी विरोधात कडक भूमिका घेणार आहे.
रामराव ढिकले,
पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा