मराठा वधूवर मंडळाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:55+5:302021-07-28T04:21:55+5:30
श्रीरामपूर : मराठा वधू-वर मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विवाह जुळले आहेत. ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार वधू-वर मंडळाचे कामकाज सुरू ...

मराठा वधूवर मंडळाचा
श्रीरामपूर : मराठा वधू-वर मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विवाह जुळले आहेत. ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार वधू-वर मंडळाचे कामकाज सुरू करण्याचा निर्णय स्तुत्य आहे. या माध्यमातून सामाजिक कार्याला मोठा हातभार लागत असल्याचे मराठा समाज सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विलास जाधव यांनी सांगितले. शिवबा हॉल येथे आयोजित वधू-वर मंडळाच्या बैठकीत जाधव बोलत होते. यावेळी मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवत लासुरे, नूतन अध्यक्ष सुरेश कांगुणे उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत डॉ. अरविंद बडाख यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र मोरगे यांनी केले. शहाजी चेडे, सीमा जाधव, बबनराव तोडमल, रमेश नवले, लक्ष्मीकांत शिंदे, जयश्री नवले, मयुरा निंबाळकर, लतिका गागरे, ऋषिकेश मोरगे, अमोल जैत, स्वप्निल लांडे, अविनाश पटारे, स्वप्निल जाधव, राजदीप जाधव आदी उपस्थित होते.