जिजामाता महाविद्यालयात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:39+5:302021-01-03T04:21:39+5:30
जीवनात प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपआपल्या परिसरात काम केल्यास. आपण सर्वजण कोरोना महामारीतून बाहेर येऊ. सद्यस्थितीत रक्ताची कमतरता असल्याने ...

जिजामाता महाविद्यालयात रक्तदान शिबिर
जीवनात प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपआपल्या परिसरात काम केल्यास. आपण सर्वजण कोरोना महामारीतून बाहेर येऊ. सद्यस्थितीत रक्ताची कमतरता असल्याने रक्तदानासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले यांनी यावेळी केले.
याप्रसंगी अशोक मिसाळ, प्रशासकीय अधिकारी दिनकर टेकणे, प्राचार्य डॉ. रामकिसन सासवडे, जिल्हा रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.संध्या कवडे, प्रा.डॉ. शिरीष लांडगे, प्रा. मोहिनी साठे, प्रा. निलेश खरात , प्रा.भारत वाबळे, प्रा.पांडुरंग देशमुख , प्राचार्य सोपान मते, के.डी.मडके, डॉ.शरद कोलते, प्रा दत्ता वाकचौरे आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. रक्त संकलनासाठी जिल्हा रुग्णालयाचे ज्ञानेश्वर मगर, स्नेहल सावंत, मोहन टोकळे , गोकुळ गर्जे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय महेर यांनी केले. उपप्राचार्य प्रा. डॉ.संभाजी काळे यांनी आभार मानले.