‘लोकमत’च्या वतीने आजपासून जिल्हाभर महारक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:07+5:302021-07-02T04:15:07+5:30

अहमदनगर : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आजपासून महिनाभर नगर जिल्ह्यात ...

Blood donation camp in the district on behalf of 'Lokmat' from today | ‘लोकमत’च्या वतीने आजपासून जिल्हाभर महारक्तदान शिबिर

‘लोकमत’च्या वतीने आजपासून जिल्हाभर महारक्तदान शिबिर

अहमदनगर : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आजपासून महिनाभर नगर जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराचा प्रारंभ शुक्रवारी (दि.२) सकाळी १० वाजता येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये होणार आहे. येथेच शुक्रवारी दिवसभर इच्छुकांना रक्तदान करता येणार आहे.

कोरोनाच्या निर्बंधामुळे राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले होते. त्यामुळे राज्यभरात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कोरोनामुळे थांबलेल्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयांमध्ये सुरू आहेत. त्यासाठी रुग्णांना रक्ताची मोठी गरज असते. हीच गरज लक्षात घेऊन ‘लोकमत’ने राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. २ जुलै रोजी स्व. जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांची जयंती आहे. याच तारखेपासून महिनाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराचा प्रारंभ आज, शुक्रवारी (दि.२) सकाळी १० वाजता आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये होणार आहे. राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्‌घाटन होणार आहे. त्यानंतर आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रक्तपेढीमध्ये सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर सुरू राहणार आहे. या शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन ‘लोकमत परिवारा’तर्फे करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, तसेच काही शहरांत रक्तदान शिबिर होणार आहेत. यामध्येही नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----------------

रक्तदान शिबिराचे असे आहे वेळापत्रक

दिनांक गाव स्थळ

२ जुलै अहमदनगर आचार्य आनंदऋषीजी महाराज रुग्णालय रक्तपेढी

२ जुलै अहमदनगर प्रहार करिअर ॲकेडमी, नगर-औरंगाबाद रोड

४ जुलै खर्डा (ता. जामखेड) लाड हॉस्पिटल

५ जुलै अहमदनगर बाजार समिती, नेप्ती

६ जुलै श्रीगोंदा रत्नकमल मंगल कार्यालय

७ जुलै जामखेड ल.ना. होशिंग विद्यालय

८ जुुलै शिर्डी साई संस्थान हॉस्पिटल

११ जुलै कोपरगाव मराठा पंच कार्यालय

१२ जुलै नेवासा पंचायत समिती हॉल

१३ जुलै कर्जत जिल्हा परिषद शाळा

१४ जुलै संगमनेर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हॉल

१९ जुलै पाथर्डी श्री. आनंद कॉलेज

२० जुलै श्रीरामपूर आगाशे सभागृह

अहमदनगर (सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.००)

(दुपारी १२ ते सायंकाळी ५)

-----------

यांना करता येईल रक्तदान

१८ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्ती

कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते

लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी रक्तदान करता येते

-------------

रक्तदान अभियानाचा लोगो आवश्यक

Web Title: Blood donation camp in the district on behalf of 'Lokmat' from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.