गोगलगावात ५३ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:08+5:302021-07-19T04:15:08+5:30
जिवलग मित्रपरिवार सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, मराठा मावळा संघटना तथा लोकमत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गोगलगाव ग्रामपंचायत प्रांगणातील ...

गोगलगावात ५३ दात्यांनी केले रक्तदान
जिवलग मित्रपरिवार सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, मराठा मावळा संघटना तथा लोकमत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गोगलगाव ग्रामपंचायत प्रांगणातील हनुमान मंदिर सभामंडपामध्ये रक्तदान शिबिर पार पडले. जिवलग मित्र परिवार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष देवाभाऊ गाढवे, मराठा मावळा संघटनेचे अमोल पावसे, लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश ठोके, संकेत गुळवे, प्रसाद थोरात, सोपानराव पांढरकर, मंजूश्री गुळवे, अर्चना गुळवे, संगीता चौधरी उपस्थित होते.
रक्तदात्यांना व उपस्थितांना चहा, नाश्त्यासोबत मास्क, सॅनिटायझर, सीताफळ, गुळवेल, अडुळसा, आंबा, चिंच, आवळा आदी वृक्ष भेट देण्यात आले. जिवलग मित्र परिवार सोशल फाउंडेशन, मराठा मावळा संघटना यांच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. रक्तदान शिबिरात तब्बल २५ शेतकऱ्यांनी, तर ५ महिलांनी रक्तदान केले.
लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट, निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथील तरंग उद्योग समूह, लोणी पोलीस ठाणे यांच्यासोबत पाटबंधारे विभागाचे गणेश हारदे, सचिनदादा आहेर, मंडल अधिकारी अनिल मांढरे, भूषण खताळ, अभिषेक थोरात, सुयोग भुजबळ, नरेश बाचकर, माउली बोरचटे, राधाकृष्ण गुळवे, अक्षय बांगर यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ‘लोकमत’चे पत्रकार गणेश आहेर, पत्रकार नितीन गमे, पत्रकार लखन गव्हाणे, नरेश वायकर, दिलीप घुले, ओंकार नलावडे, सुजल गुंजाळ, सविता चौधरी, पूनम गुळवे, मंदाताई चौधरी, शिवाजी चौधरी, गौरी गुळवे, ईश्वरी गुळवे यांनी परिश्रम घेतले.
...........
घराघरात रक्ताची नाती जपण्याचा अन् जोडण्याचा असा एक वेगळा संदेश दिला आहे. या उपक्रमामुळे महिलाही रक्तदान करू शकतात हे ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने पोहोचले. यानिमित्ताने महिलांच्या आरोग्य तपासणीचे एक पाऊल पुढे पडले आहे.
प्रतिभा पाटील, संचालिका, वर्ल्ड परफेक्ट अकादमी, लोणी
.....................
रक्तदाते
मिलिंद आहेर, प्रतिभा पाटील, युवराज गुळवे, अनिल चौधरी, श्रीधर सपकाळ, संकेत गुळवे, अमोल ढगे, विकीन वराडे, धनंजय गिते, विजय गुळवे, सोमेश्वर सातकर, शुभम जत्ती, अनिल शेलार, मच्छिंद्र गायकर, आकाश आचाट, श्रीपाद जाधव, पवन पनले, तुषार पांढरकर, शुभम गायकर, भारत डेंगळे, सचिन चौधरी, सुनील मगर, संकेत मोखाडे, सचिन चोपडे, रवींद्र चौधरी, सविता गुळवे, अभिजित कार्ले, नितीन रिंढे, दादासाहेब खाडे, प्रशांत जायभाय, प्रदीप ढगे, योगेश गुळवे, अक्षय भोर, उषा खताळ, ज्ञानेश्वर भोरकाटे, सुनील निर्मळ, बाबूराव पुंड, भीमराज शेळके, सुमित कोरडे, आकाश सोनावणे, रूपेश सोसे, राधाकिसन गुळवे, निखिल मगर, सचिन धनवटे, महेश गायकर, नीलेश लव्हाटे, मच्छिंद्र गुळवे, श्रीकांत पडवळ, सुनील मगर, सचिन तनपुरे, सतीश कदम, सोमनाथ तारगे, सचिन पोकळे, अभय जाधव, संजय दिवटे.