नेवाशातील शिबिरात ४५ जणांचे रक्तदान
By | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:38+5:302020-12-07T04:15:38+5:30
नेवासा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी शहरातील पंचायत समिती येथे नेवासा शहर शिवसेना ...

नेवाशातील शिबिरात ४५ जणांचे रक्तदान
नेवासा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी शहरातील पंचायत समिती येथे नेवासा शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ४५ जणांनी रक्तदान केले.
प्रास्ताविकात लोकमान्य ब्लड बँकेचे डाॅ. केशव वाघ यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून शहरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुढील काळातही शहर शिवसेना सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहून समाजाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष नीरज नांगरे, युवा सेनाप्रमुख कैलास लष्करे, विकास लष्करे, राहुल लष्करे, नितीन लष्करे, रवींद्र माळी, अमोल मोरे, राहुल कुसळकर, शुभम डोकडे, भरत जाधव, बाबासाहेब लष्करे, गणेश जाधव, अभिजित राऊत, सौरभ राऊत, प्रदीप भूमकर, सागर शिंदे, सुनील शिंदे, रोहित लष्करे, शुभम मोहिते, वैभव कर्डीले, शिवाजी लष्करे, माऊली दहातोंडे, सदा गाडेकर आदी उपस्थित होते.
फोटो : ०६ नेवासा रक्तदान
नेवासा शहरात आयोजित रक्तदान शिबिरातील सहभागी युवक.