बहादूरगडावरील शिबिरात १०१ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:20 IST2021-03-19T04:20:29+5:302021-03-19T04:20:29+5:30

काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहादूरगडावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यदिननिमित्त शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले. जनकल्याण रक्तपेढीचे ...

Blood donation of 101 people in Bahadurgarh camp | बहादूरगडावरील शिबिरात १०१ जणांचे रक्तदान

बहादूरगडावरील शिबिरात १०१ जणांचे रक्तदान

काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहादूरगडावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यदिननिमित्त शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले. जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. दिलीप दाणे, डॉ. विलास मर्डीकर, गजेंद्र सोनवणे, उज्ज्वला शिंदे, सुलभा पवळ, मनीषा जोशी, बाळासाहेब खरपुडे, चंद्रकला फंड, किशोर यादव यांनी यासाठी विशेष साहाय्य केले. जतन, माहितीपट, मोहिमा तसेच कार्यक्रम आयोजित करत किल्ल्याचा इतिहास सर्वसामान्य जनमानसापर्यंत पोहोच करत आहेत. लोकांमध्ये इतिहासाबद्दल संवर्धनाबदल आस्था निर्माण करण्याचे, असे महत्त्वाचे कार्य टीम करत आहे. या सामाजिक कार्यासाठी डॉ. नीलेश खेडकर, प्रतीक पाचपुते, प्रा. राजेश बाराते, राहुल परकाळे, राहुल सुपेकर, योगेश वाघमोरे, किरण कवडे, लाला अवचर, वैभव पाचपुते, अक्षय धारकर, आकाश लगड, प्रशांत यादव, धनंजय कुतवळ, तेजस खेडकर, शुभम गोरे, महेश मुळे, पवार शुभम, प्रवीण राऊत आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation of 101 people in Bahadurgarh camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.