लोकमत"च्या शिबिरातून झालेले रक्त संकलन रुग्णांसाठी जीवदान ठरेल- शंकरराव गडाख, रक्तदान शिबिराचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 16:34 IST2021-07-02T16:33:47+5:302021-07-02T16:34:18+5:30
अहमदनगर : लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समुहाने राज्यभर केलेल्या रक्तदान शिबिरातून झालेले रक्त संकलन रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

लोकमत"च्या शिबिरातून झालेले रक्त संकलन रुग्णांसाठी जीवदान ठरेल- शंकरराव गडाख, रक्तदान शिबिराचा प्रारंभ
अहमदनगर : लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समुहाने राज्यभर केलेल्या रक्तदान शिबिरातून झालेले रक्त संकलन रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
येथील आनंदऋषीजी महाराज ब्लड सेंटरमध्ये मंत्री गडाख यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले..त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद अंकुश, आनंदऋषीजी रुग्णालयाचे विश्वस्त अशोक कोठारी, प्रशासकीय अधिकारी आशिष भंडारी, गणेश कंकरिया आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनीही लोकमतच्या या मोहिमेचे कौतुक करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विविध संस्था, संघटना व लोकमत परिवारातील सदस्यांनी रक्तदान केले. 4 जुलैपासून जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहेत.