शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमध्ये धनशक्तीमुळे भाजपाचा विजय : सहकारमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:03 IST

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळेल असे वाटत होते. मात्र ऐनवेळी मनसेचे महापौर भाजपात गेले.

शिर्डी : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळेल असे वाटत होते. मात्र ऐनवेळी मनसेचे महापौर भाजपात गेले. सुरेशदादा जैन जॉईन झाले. ऐनवेळी झालेली गद्दारी व निवडणुकीत धनशक्तीचा झालेला वापरामुळे निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिर्डीत सांगितले़ साईदर्शनानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला़पाटील म्हणाले, आमचा पराभव आम्ही स्विकारला. आता चांगल्या कामात त्यांना मदत करु. जिथे शहराच नुकसान होईल तिथे विरोध करणार. ही निवडणुक काही दिल्लीची निवडणुक नव्हती. ही निवडणुक गटर, वॉटर आणि मीटरची होती़ राम मंदीर यही बनायेगे, तारीख नही बतायेगे अशी ही निवडणुक नव्हती़ त्यामुळे स्थानिक प्रश्नावर जनतेने भाजपाला कौल दिला आहे़ राष्ट्रवादी तर खातेही खोलु शकली नाही. मात्र शिवसेनेचे पंधरा नगरसेवक निवडुन आल. आम्ही बळजबरीने भाजपा मागे जात नाहीत. आम्ही एकटे लढायचा निर्णय घेतलाही आणि लढलोही. सांगली निवडणुकीत आम्ही भाजपाशी युती करून लढलो असतो तर आमच्याही जागा आल्या असत्या. मात्र आम्ही जळगाव आणि सांगली येथे स्वबळावर लढलो. खडसे व महाजनांमध्ये कोण प्रभावी ठरले, या प्रश्नावर बोलतांना पाटील म्हणाले, खडसेंनी आपले ४० वर्षे भाजपामध्ये घातले आहे़ गिरीश महाजन यांना जेव्हापासून राजकारण कळायला लागले तेव्हापासून ते भाजपात आहेत़ त्यांच्यात वरचढ कोण आहे हे त्यांनीच समजून घ्यावे़ आम्हाला दोघेही सारखेच दिसतात़ हिना गावित यांच्यावर करण्यात आलेला हल्ला दुर्देवी असून आंदोलकांनी सयंम बाळगावा, असे आवाहनही पाटील यांनी केले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीJalgaonजळगावSangliसांगली