नेवाशात भाजपचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:17+5:302021-02-06T04:38:17+5:30
नेवासा : वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची वसुली तातडीने थांबवावी, वीज कनेक्शन तोडण्याचा आदेश मागे घ्यावा आणि ...

नेवाशात भाजपचे ठिय्या आंदोलन
नेवासा : वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची वसुली तातडीने थांबवावी, वीज कनेक्शन तोडण्याचा आदेश मागे घ्यावा आणि शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांसाठी नेवासा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत भाजपच्या वतीने शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हा संघटन मंत्री नितीन दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी मनोगत व्यक्त करीत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, गणेश राठी, बाळासाहेब कुलकर्णी, निरंजन डहाळे, आदिनाथ पटारे, जनार्दन जाधव, नगरसेवक सुनील वाघ, डॉ. लक्ष्मण खंडाळे, राजेंद्र मापारी, लक्ष्मण मोहिटे, विश्वास काळे, अशोक टेकणे, राजेश कडू, अप्पासाहेब गायकवाड, कैलास दहातोंडे, बाबा जंगले, महेश पवार, प्रफुल जाधव आदी उपस्थित होते.
फोटो : ०५ नेवासा बीजेपी
नेवासा येथे महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारले.