श्रीगोंद्यात भाजपचे हल्ल्लाबोल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:11+5:302021-02-06T04:37:11+5:30
आमदार पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी श्रीगोंदा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले. पाचपुते पुढे म्हणाले, तालुक्यात ...

श्रीगोंद्यात भाजपचे हल्ल्लाबोल आंदोलन
आमदार पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी श्रीगोंदा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले.
पाचपुते पुढे म्हणाले, तालुक्यात घोड विसापूर व कुकडीचे आवर्तन चालू आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हा सावळा गोंधळ असताना ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या बोगस कारभारावर हल्ला चढविला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, बाळासाहेब महाडिक, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, नगरसेवक संतोष खेतमाळीस, बापूसाहेब गोरे ,अशोक खेंडके, संग्राम घोडके शहाजी खेतमाळीस नितीन नलगे, माजी सभापती शहाजी हिरवे, पोपट खेतमाळीस, दीपक शिंदे, राजेंद्र उकांडे, जयश्री कोथिंबिरे, दीपक हिरनावळे, महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
यावेळी वीजवितरणचे अधिकारी चौगुले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
...
फोटो-०५श्रीगोंदा भाजप आंदोलन
...
ओळी-आमदार पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी श्रीगोंदा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले.