कोपरगावात भाजपाचे हल्लाबोल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:18+5:302021-02-06T04:37:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : महावितरण कंपनीने राज्यातील सुमारे ७५ लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या ...

कोपरगावात भाजपाचे हल्लाबोल आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : महावितरण कंपनीने राज्यातील सुमारे ७५ लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव महवितरण कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.५) हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. त्यानंतर महावितरण कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी.एस. खराटे व उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाप्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी महविकास आघाडी सरकारचा आपल्या शैलीत चांगलाच समाचार घेतला, तसेच तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, भाजपा नेते केशव भवर, खल्लील कुरेशी, अनुसूचित सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, एल.. पानगव्हाणे, आरपीआयचे नेते जितेंद्र रणशूर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, माजी सभापती मछिंद्र टेके यांनी आपल्या भाषणातून महावितरण कंपनीच्या धोरणावर चांगलीच टीका केली.
याप्रसंगी युवा नेते विवेक कोल्हे, शहाराध्यक्ष दत्ता काले, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, विजय वाजे, कोल्हे कारखान्याचे संचालक फकीरराव बोरनारे, बाळासाहेब नरोडे, अरुण येवले, बाळासाहेब पानगव्हाणे, सुशांत खैरे, सुवर्णा सोनवणे, शिल्पा रोहमारे, हर्षा कांबळे, मुकुंद काळे, राजेंद्र भाकरे, कैलास खैरे, राजेंद्र सोनवणे, विश्वास महाले, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांच्यासह शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....................
फोटो०५ कोपरगाव भाजपा निवेदन