पाथर्डीत भाजपचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST2021-03-22T04:20:17+5:302021-03-22T04:20:17+5:30

पाथर्डी : भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांची सखोल चौकशी करावी, या प्रमुख मागणीसाठी ...

BJP's dam agitation in Pathardi | पाथर्डीत भाजपचे धरणे आंदोलन

पाथर्डीत भाजपचे धरणे आंदोलन

पाथर्डी : भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांची सखोल चौकशी करावी, या प्रमुख मागणीसाठी पाथर्डी तालुका भाजपच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक चौकात धरणे आंदोलन करून पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात भाजप भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अशोक चोरमले, प्रदेश सदस्य राजेंद्र दगडखैर, तालुका सरचिटणीस जे. बी. वांढेकर, पाथर्डी शहराध्यक्ष अजय भंडारी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती उत्तम गर्जे, संचालक मधुकर काटे, रवींद्र वायकर, पं. स. सदस्य सुभाष केकाण, नगरसेवक बजरंग घोडके, अनिल बोरूडे, बबन बुचकूल, महेश बोरुडे, रमेश हंडाळ, मंगलताई कोकाटे, माजी जि. प. सदस्य भगवान साठे, प्रसिद्धीप्रमुख नारायण पालवे, माजी तालुका उपाध्यक्ष राम लाड आदी उपस्थित होते.

Web Title: BJP's dam agitation in Pathardi