२०४ पैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 15:36 IST2017-10-09T15:35:35+5:302017-10-09T15:36:31+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात २०४ ग्रामपंचायतींपैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाप्रणित मंडळांनी सत्ता मिळविल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड केला आहे़ पक्षाच्या ...

२०४ पैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाचा दावा
अहमदनगर : जिल्ह्यात २०४ ग्रामपंचायतींपैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाप्रणित मंडळांनी सत्ता मिळविल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड केला आहे़ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केल्यामुळेच भाजपाला हे मोठे यश मिळाल्याचे बेरड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़
भाजपा प्रणित मंडळांनी १६४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी उमेदवार उभे केले होते़ तर ४० ग्रामपंचायतींमध्ये विविध स्थानिक आघाड्यांसह भाजपा निवडणुकीच्या आखााड्यात उरतला होता़ यातील पक्षाने दिलेल्या १६४ पैकी ८३ जागांवर सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजपा पुरस्कृत आघाडीने लढविलेल्या ४० पैकी २५ जागांवरील सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत़ भाजपाने एकूण १०८ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली असून, मतदारांनी सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे बेरड यांनी म्हटले आहे़