काळे कपडे परिधान करुन नेवाशात भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 14:53 IST2020-05-22T14:52:27+5:302020-05-22T14:53:21+5:30
भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारविरोधात शहरात शुक्रवारी (दि.२२ मे) दुपारी निदर्शने करण्यात आली. कोरोनाची साथ हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालत सरकारचा निषेध नोंदविला.

काळे कपडे परिधान करुन नेवाशात भाजपचे आंदोलन
नेवासा : भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारविरोधात शहरात शुक्रवारी (दि.२२ मे) दुपारी निदर्शने करण्यात आली. कोरोनाची साथ हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालत सरकारचा निषेध नोंदविला.
शहरातील बस स्थानकासमोरील चौकात हे आंदोलन झाले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या समवेत तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, गटनेते सचिन नागपुरे, नगरसेवक सुनील वाघ, राजेंद्र मापारी, सतीश गायके, सुभाष पवार, मनोज पारखे, स्वप्नील साखरे, निरंजन डहाळे, येडूभाऊ सोनवणे, राजेंद्र मुथ्था, आदिनाथ पटारे उपस्थित होते.
मुरकुटे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यास महाआघाडी सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ भाजप राज्यभरआंदोलन करीत आहे. संक्रमितांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा जनतेला त्रास होत आहे. शेतकरी होरपळा असून विद्यार्थी वर्गासह सर्वच स्तरातील नागरिक संकटात सापडले आहेत.