नेवासेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप पुढाकार घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST2021-06-19T04:15:30+5:302021-06-19T04:15:30+5:30
नेवासा : नेवासेकरांच्या समस्या व शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी भाजप पुढाकार घेणार आहे, असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी ...

नेवासेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप पुढाकार घेणार
नेवासा : नेवासेकरांच्या समस्या व शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी भाजप पुढाकार घेणार आहे, असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी केले.
नेवासा येथे भाजप शहर कार्यकारिणीची गुरुवारी बैठक झाली यावेळी ते बोलत होते. सुरुवातीस कोरोनामुळे मृत्यू झालेले शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर टेकाळे व मंजाबापू नजन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी पारखे यांनी एक वर्षात पक्षाने केलेल्या विविध उपक्रम व आंदोलनाची माहिती देत संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश युवक संपर्कप्रमुख निरंजन डहाळे यांनी पुढील आठवड्यात आंतरराष्ट्रीय योगदिन शिबिर आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहविषयी माहिती दिली.
नगरसेवक सचिन नागपुरे म्हणाले, नगरपंचायतीत भाजपच्या काळात आलेल्या निधीतून होत असलेल्या कामांना गती देण्यासाठी तसेच भाजप नगरसेवक असलेल्या प्रभागात जाणीवपूर्वक निधी दिला जात नाही. त्यामुळे आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे.
यावेळी गटनेते सचिन नागपुरे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश युवक संपर्कप्रमुख निरंजन डहाळे, शहर उपाध्यक्ष राजेश कडू, सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, विलास बोरुडे, कृष्णा डहाळे, आकाश कुसळकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतीक शेजूळ यांनी केले. संजय गवळी यांनी आभार मानले.