शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

बाळासाहेब थोरातांनी मुलाला डिवचलं; आता राधाकृष्ण विखेंकडून खोचक शब्दांत पलटवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 18:54 IST

सुजय विखे यांनी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती.

Radhakrusna Vikhe Patil ( Marathi News ) : अहमदनगरच्या राजकारणातील जुने राजकीय प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने आपल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांची खिल्ली उडवल्यानंतर थोरात यांच्या टीकेला भाजप नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "आमच्या मुलाचा कोणता छंद पुरवायचा आणि काय करायचं, हे मला त्यांनी शिकवण्याची गरज नाही. तुम्ही राजकारणात तुमचं कुटुंब उतरवलंच आहे. तुमच्या घरातल्या मुला-मुलींचा छंद पुरवला तो चालतो. दुसऱ्याच्या मुलाची कशाला काळजी करता?" असा खोचक प्रश्न विखे यांनी विचारला आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुजय विखे यांनी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचं गेल्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करत असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी खोचक टोला लगावला होता. "मोठ्या कुटुंबातील लाडकं लेकरू आहे. त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे. हा छंद पक्षाने नाही तर तो पालकाने पुरवला पाहिजे. दोन मतदारसंघांतून लढवण्यासाठी इच्छुक आहे, असं ते म्हटले होते. त्यांचा छंद पुरवण्यासाठी ते दोन्ही ठिकाणी उभे राहू शकतात. यामुळे बालकाचा छंद तर पुरा होईल," असं थोरात म्हणाले.

याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "संगमनेरमध्ये दहशतीचं राजकारण सुरू आहे. तालुक्यात हुकूमशहा तयार झाला आहे. तालुका पूर्णपणे उद्ध्वस्त केला असून ठराविक लोकांचा विकास झाला आहे. त्यामुळे तालुक्याला नवीन चेहरा हवा, अशी आता लोकभावना झाली असून या लोकभावनेचा कसा आदर करायचा, हे पक्षश्रेष्ठींना कळवू," असं म्हणत राधाकृष्ण विखेंनी अप्रत्यक्षरीत्या आपण सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सुजय विखे नक्की काय म्हणाले होते?

विधानसभा निवडणूक लढविण्‍याच्‍या प्रश्‍नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी म्हटलं होतं की, "उत्‍तर भागामध्‍ये श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकारण खूप क्लिष्‍ट आहे. त्‍यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्‍यात अनेकजण इच्‍छुक आहेत. त्‍यांच्‍यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फक्‍त अर्ज करण्‍याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार," अशी भूमिका सुजय विखेंनी मांडली होती.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसBJPभाजपा