खर्डा, साकतमध्ये भाजपला धक्का; राष्ट्रवादीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 11:11 IST2021-01-18T11:11:04+5:302021-01-18T11:11:51+5:30

जामखेड तालुक्यातील खर्डा, साकत ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने झेंडा फडकावला आहे. येथे  राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला.

BJP pushed in Kharda, Sakat; Nationalist flag | खर्डा, साकतमध्ये भाजपला धक्का; राष्ट्रवादीचा झेंडा

खर्डा, साकतमध्ये भाजपला धक्का; राष्ट्रवादीचा झेंडा

जामखेड  :  तालुक्यातील खर्डा, साकत ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने झेंडा फडकावला आहे. येथे  राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला.

    साकतमध्ये राष्ट्रवादी ५ तर भाजप ४ व दोन अपक्ष असे बलाबल आहे दोन बिनविरोध आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ७ झाले आहे. पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांचे दहा वर्षांपासून असलेली सत्ता पलटी झाली आहे.

खर्डा पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने दुसर्‍या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर करून विजय मिळविला आहे. येथे राष्ट्रवादीचे ११ तर भाजपचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. 

Web Title: BJP pushed in Kharda, Sakat; Nationalist flag