नेवासा येथे भाजपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST2021-03-22T04:20:15+5:302021-03-22T04:20:15+5:30

नेवासा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेवासा येथे खोलेश्वर गणपती चौकात भाजपच्या वतीने रविवारी सकाळी घोषणा देत निदर्शने ...

BJP protests in Nevasa | नेवासा येथे भाजपची निदर्शने

नेवासा येथे भाजपची निदर्शने

नेवासा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेवासा येथे खोलेश्वर गणपती चौकात भाजपच्या वतीने रविवारी सकाळी घोषणा देत निदर्शने करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा संघटन चिटणीस व तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी केली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करीत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी झालेल्या निदर्शने आंदोलनामध्ये नगरसेवक सुनील वाघ, शहराध्यक्ष मनोज पारखे, राजेंद्र मापारी, निरंजन डहाळे, स्वप्नील मापारी, आदिनाथ पटारे, विशाल धनगर, पोपटराव शेकडे, अमोल कोलते, रमेश रोडे, किरण धनगर, प्रतीक शेजूळ, अंकुश विटकर उपस्थित होते.

--

२१ नेवासा बीजेपी

नेवासा येथे भाजपच्या वतीने रविवारी सकाळी निदर्शने करण्यात आली.

Web Title: BJP protests in Nevasa