श्रीरामपुरात भाजपने ठोकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:00+5:302021-02-06T04:38:00+5:30
श्रीरामपूर : भारतीय जनता पक्षाच्या शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महावितरण कंपनीच्या येथील कार्यालयाला कुलूप ठोकत राज्य सरकारचा निषेध ...

श्रीरामपुरात भाजपने ठोकले
श्रीरामपूर : भारतीय जनता पक्षाच्या शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महावितरण कंपनीच्या येथील कार्यालयाला कुलूप ठोकत राज्य सरकारचा निषेध केला. वीज दरवाढ तसेच ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या धोरणावर यावेळी सडकून टीका करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली हे टाळा ठोको हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामभाऊ तरस, महेश खरात, भटक्या विमुक्त जातीचे जिल्हा संयोजक विठ्ठल राऊत, सांस्कृतिक आघाडीचे बंडूकुमार शिंदे, बेलापूर शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, अजित बाबेल, विजय लांडे, विशाल अंभोरे, विशाल यादव, अक्षय वरपे आदी उपस्थित होते.
शहरातील मुख्य रस्त्यावरील महावितरणच्या मुख्य कार्यालयास आंदोलकांनी कुलूप लावले. सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. ग्राहकांना नोटिसा पाठवून त्यांना अंधारात ठेवण्याचे काम सरकारने करू नये. अव्वाचे सव्वा वीज बिल अकारणी करू नये, अशी मागणी करण्यात आली. आघाडी सरकारने केलेल्या वीज बिल माफीची घोषणा केली. प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र केली नाही. सरकारने आपल्या भूमिकेवर घुमजाव केले. वीज जोडणी तोडण्याचे आदेश महावितरणला दिले, अशी टीका आंदोलकांनी केली.
आंदोलनात पुरुषोत्तम भराटे, रूपेश हरकल, योगेश ओझा, रवी पंडित, मिलिंद साळवे, राकेश कुंभकर्ण, किशोर खरवंडे, अशोक मुळे, सुहास पंडित, मच्छिंद्र हिंगमिरे, दिनेश दळवी, बाळासाहेब डफळ सहभागी झाले होते.
---------
फोटो ओळी : भाजप आंदोलन
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना भाजप नेते बबनराव मुठे, मारुती बिंगले, सतीश सौदागर आदी.
------