भाजपने ठाेकले महावितरणच्या कार्यालयांना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:28+5:302021-02-06T04:38:28+5:30
अहमदनगर : थकीत वीज बिलासाठी विद्युत जोड तोडण्याबाबत दिलेल्या नोटिसीचा महावितरणच्या शहर व परिसरातील कार्यालयांना टाळे ठोकून शहर भाजपने ...

भाजपने ठाेकले महावितरणच्या कार्यालयांना टाळे
अहमदनगर : थकीत वीज बिलासाठी विद्युत जोड तोडण्याबाबत दिलेल्या नोटिसीचा महावितरणच्या शहर व परिसरातील कार्यालयांना टाळे ठोकून शहर भाजपने शुक्रवारी निषेध केला.
महावितरणने राज्यातील ७५ लाख ग्राहकांना वीज जोडण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यभरातील महावितरणच्या कार्यालयांवर हल्लाबोल केला. नगरमध्ये महापौर बाबासाहब वाकळे यांच्यासह शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सावेडी उपनगरातील कार्यालयाला टाळे ठोकून निषेध केला. भाजपचे शहर मंडलाध्यक्ष अजय चितळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. तसेच भिंगार येथेही आंदोलन करण्यात आले.
कोरोना काळात संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झालेला होता. लॉकडाऊनच्या काळात महावितरणने ग्राहकांना अंदाजे बिलांची आकारणी केली. ग्राहकांना ३ ते ४ महिन्यांचे एकत्रित बिल वाटप करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांवर आर्थिक बोजा पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांच्या हातचे काम गेले. अनेक नागरिक बेरोजगार झाले. महावितरणची ही दंडेलशाही भाजप खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात उपमहापौर मालनताई ढोणे, नरेंद्र कुलकर्णी, अजय ढोणे, अभिजीत ढोणे, अभिजीत चिप्पा, राहुल कवडे, अतुल दातरंगे, सचिन वाघ, अजय राऊत, अमित पाथरकर, रोहित मुळे, आशिष आनेचा, सचिन कुलकर्णी, रोशन गांधी, प्रशांत चितळे, संतोष लोंढे, अमित कीर्तने, डॉ. दर्शन करमाळकर, भूषण अंभोरे, महेश हेडा, गोपाल वर्मा, आदेश गायकवाड आदी उपस्थित होते.
...
सूचना फोटो -४ बीजेपी नावाने आहे.