भाजपचा उमेदवार राष्ट्रवादीकडून हायजॅक, महापालिका स्थायी समिती निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 12:52 IST2020-09-24T12:52:10+5:302020-09-24T12:52:57+5:30
अहमदनगर: भाजपकडून स्थायी समिती सभापतीसाठी इच्छुक असलेले नगरसेवक मनोज खोतकर यांनी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपचा उमेदवार राष्ट्रवादीकडून हायजॅक, महापालिका स्थायी समिती निवडणूक
अहमदनगर: भाजपकडून स्थायी समिती सभापतीसाठी इच्छुक असलेले नगरसेवक मनोज खोतकर यांनी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजप साठी हा मोठा धक्का मानला जात असून सभापती पदाचा उमेदवारच राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतल्याने भाजपचे ऐनवेळी पंचायत झाली आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती पदासाठी उद्या शुक्रवारी एक वाजता निवडणूक होत आहे.
भाजपकडून मनोज कोतकर हे इच्छुक होते इच्छुक आहेत भाजपनेही त्यांच्या मागे ताकद उभी केली होती .सभापतीपदासाठी निवडून आणण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही कोतकर यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती मात्र ऐनवेळी कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीच्या राजकीय समीकरणे अचानक बदलली आहेत