बड्या नेत्यांच्या बड्या लढती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:15 IST2021-01-10T04:15:03+5:302021-01-10T04:15:03+5:30

.... निंबळकमध्ये सारेच मातब्बर रिंगणात निंबळक गावात माजी सरंपच विलास लामखडे यांच्या विरोधात त्यांच्या काकांचा मुलगा दत्तात्रय कोतकर व ...

Big fights of big leaders .. | बड्या नेत्यांच्या बड्या लढती..

बड्या नेत्यांच्या बड्या लढती..

....

निंबळकमध्ये सारेच मातब्बर रिंगणात

निंबळक गावात माजी सरंपच विलास लामखडे यांच्या विरोधात त्यांच्या काकांचा मुलगा दत्तात्रय कोतकर व चुलतभाऊ शरद लामखडे यांच्यात चुरशीची तिरंगी लढत होत आहे. विलास लामखडे यांच्या सून प्रियंका लामखडे यांच्या विरोधात माजी सरपंच साधना लामखडे यांच्यात काट्याची लढाई होत आहे. जि. प. सदस्य माधवराव लामखडे यांच्या सून प्रांजली लामखडे यांच्या विरोधात युवा सेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश कोतकर यांच्या भावजय वैशाली कोतकर व शहाबाई रोहकले यांच्यात तिरंगी लढाई होत आहे. युवा सेनेचे तालुकाप्रमुख अविनाश कोतकर यांचे बंधू नितीन कोतकर यांच्या विरोधात माजी उपसरपंच घनशाम म्हस्के यांचे पुत्र महेश म्हस्के लढत देत आहेत. भाजपचे सरचिटणीस राजेंद्र कोतकर व माजी उपसरपंच अशोक पवार यांच्यातील लढत चर्चेची ठरत आहे.

...

Web Title: Big fights of big leaders ..