कल्पतरू गटाला बायफचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:37+5:302020-12-22T04:20:37+5:30

राज्यभरातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांचा योग्य सन्मान व्हावा व बचत गटांना ग्रामीण भागाच्या विकासात समाविष्ट करताना नवीन ...

Bif's award to Kalpataru group | कल्पतरू गटाला बायफचा पुरस्कार

कल्पतरू गटाला बायफचा पुरस्कार

राज्यभरातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांचा योग्य सन्मान व्हावा व बचत गटांना ग्रामीण भागाच्या विकासात समाविष्ट करताना नवीन दिशा व उभारी मिळावी, या उद्देशाने या पुरस्काराचे दरवर्षी वितरण केले जाते. चालू वर्षांमध्ये अकोले तालुक्यातील बायफ संचलित व जनरल मिल्स पुरस्कृत आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत वर्ष २०१२ मध्ये समाविष्ट केलेल्या कल्पतरू स्वयंसहाय्यता समूहास पुरस्कार जाहीर झाला आहे. या समूहाने सेंद्रिय शेती, भाजीपाला लागवड, सुधारित पद्धतीने गोपालन, जलस्रोत विकास, स्वच्छ स्वयंपाक गृहनिर्मिती, परसबाग लागवड, कुक्कुटपालन, जलसंधारण इत्यादी उपक्रमांमध्ये सहभागी होत ग्राम विकासाच्या दृष्टीने व वैयक्तिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समूहाच्या अध्यक्ष तान्हाबाई तुकाराम डगळे तर भारती पंढरीनाथ पोटे सचिव म्हणून कार्यरत आहेत. हिराबाई पोटे, चंद्रभागा डगळे, रोहिणी डगळे, यमुनाबाई डगळे, पूजा पोटे, मुक्ता डगळे, रुक्मिणी डगळे, मंगलाबाई डगळे, विमल भारमल, कविता डगळे या महिला सदस्य म्हणून समूहात कार्यरत आहेत. समूहाला बायफच्या केंद्र समन्वयक लीला कुऱ्हे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title: Bif's award to Kalpataru group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.