भूमिपुत्रांची भरारी मायभूमीचा गौरव वाढविणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:21 IST2021-09-13T04:21:04+5:302021-09-13T04:21:04+5:30

तिसगाव : स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत समतोल टिकलाच पाहिजे. संगणकीय युगाचा हा वसा व वारसा कराळे भावंडांनी जपला आहे. ...

Bhumiputra's Bharari enhances the glory of Mayabhumi | भूमिपुत्रांची भरारी मायभूमीचा गौरव वाढविणारी

भूमिपुत्रांची भरारी मायभूमीचा गौरव वाढविणारी

तिसगाव : स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत समतोल टिकलाच पाहिजे. संगणकीय युगाचा हा वसा व वारसा कराळे भावंडांनी जपला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने त्यांना उत्कृष्ट शिकवणी वर्गाचा पुरस्कार मिळाला. भूमिपुत्रांची ही भरारी मायभूमीचा गौरव वाढविणारी आहे, असे गौरवोद्गार आमदार मोनिका राजळे यांनी काढले.

राज्याच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट शिकवणी वर्ग चालविणाऱ्या कामत शिंगवे (ता. पाथर्डी) येथील बबन कराळे, सुनील कराळे या दोन भूमिपुत्र प्राध्यापकांना पुरस्कार देऊन गौरविले. याबद्दल रविवारी राजळे यांच्या हस्ते ग्रामस्थांनी त्यांचा आई-वडिलांसमवेत नागरी सन्मान केला. या वेळी त्या बोलत होत्या.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले अध्यक्षस्थानी होते. रामकृष्ण कराळे महाराज, वृद्धेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश सुंबे, पं. स. सदस्य सुनील परदेशी, राहुल गवळी, एकनाथ आटकर, दूध संस्थेचे अध्यक्ष वैभव खलाटे, अमोल गवळी, दीपक लांडगे, धीरज मैड, संतोष शिंदे, पुरुषोत्तम आठरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रास्ताविक, स्वागत सेवा संस्थेचे अध्यक्ष पोपटराव कराळे यांनी केले. परिसरातील होतकरू, वंचित, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी दिली जाईल, अशी ग्वाही प्रा. सुनील कराळे यांनी दिली. या वेळी चारुदत्त वाघ, अमोल गवळी, नजमुद्दीन शेख, दिगंबर कराळे, उद्धव दुसंग, संजय कराळे, शुभम मोटे, दत्ता नरवणे, रमेश भुसारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

---

१२ कामत शिंगवे

कामत शिंगवे येथे बबन कराळे, सुनील कराळे यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Bhumiputra's Bharari enhances the glory of Mayabhumi