भिंगारची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST2021-06-09T04:27:15+5:302021-06-09T04:27:15+5:30
भिंगार : नगर शहराजवळील छावणी परिषद असलेल्या भिंगारची सध्या कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सध्या गावात एक किंवा दोनच रुग्ण ...

भिंगारची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
भिंगार : नगर शहराजवळील छावणी परिषद असलेल्या भिंगारची सध्या कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सध्या गावात एक किंवा दोनच रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.
मागील काही दिवसात भिंगारमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे छावणी परिषदेने शहरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली होती. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण सापडून त्यांच्यावर उपचार करणे सोपे जात होते. तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासही मदत होती. तसेच कोरोना रुग्णालयातील उपचारांच्या सकारात्मक परिणामाने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहेत. दरम्यान, छावणी परिषद रुग्णालयातील संक्रमित रुग्णांसाठी परिणामकारक पृथक्करण, योग्य उपचार पद्धती इत्यादीमुळे कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
छावणी परिषद रुग्णालयात आता कोरोना रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. छावणी परिषद शाळेमध्येदेखील एकही रुग्ण नाही. एकूणच परिस्थिती समाधानकारक असून योग्य उपचारांमुळे अधिकाधिक बाधित रुग्ण सावरत आहेत, असे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---छावणी परिषद, पोलिसांची योगदान...
भिंगार कोरोनामुक्त करण्यासाठी छावणी परिषद व पोलीस ठाण्याचे मोठे योगदान आहे. छावणी परिषद रुग्णालयाने रुग्णांना वेळेवर उपचार करून लवकरात लवकर बरे केले. पोलिसांनी विनाकारण फिरणारांवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे शहर कोरोनामुक्त झाले, याबद्दल त्यांचे आभार मानावेत तितके कमी आहेत, अशी प्रतिक्रिया येथील नागरिक शुभम जाधव यांनी व्यक्त केली.
070621\schools.jpg
अहमदनगर छावणी परिषद शाळा