भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डही होणार बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST2021-02-05T06:33:40+5:302021-02-05T06:33:40+5:30

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी सांगितले की, संरक्षण विभागाचे प्रधान निरीक्षक यांनी याबाबत पत्र सर्व कॅन्टोमेंट ...

Bhingar Cantonment Board will also be dismissed | भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डही होणार बरखास्त

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डही होणार बरखास्त

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी सांगितले की, संरक्षण विभागाचे प्रधान निरीक्षक यांनी याबाबत पत्र सर्व कॅन्टोमेंट मुख्य अधिकारी कार्यालयास पाठवलेले आहे. हे सर्व कॅन्टोमेंट बोर्ड १० फेब्रुवारी २०१५ ला अस्तित्वात आले होते. १० फेब्रुवारी २०२० पर्यंत महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिला होता. सहा सहा महिन्यांची दोनदा मुदतवाढ मिळाली होती. ही मुदत येत्या १० फेब्रुवारीला संपत आहे. आता भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता अधिकृत पत्र रक्षा संपदा विभागाकडून प्राप्त झाले आहे. ११ फेब्रुवारीपासून भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त होणार आहे. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष कारभार पाहतील.

....

संरक्षण मंत्रालयाचा आदेश रविवारी प्राप्त झाला आहे. अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्षच पुढील कामकाज येत्या ११ फेब्रुवारीपासून पाहणार आहे. त्यानुसार भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड अस्तित्वात असेल.

-विद्याधर पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड.

Web Title: Bhingar Cantonment Board will also be dismissed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.