श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठारमध्ये भरदिवसा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 19:43 IST2018-05-11T19:35:42+5:302018-05-11T19:43:35+5:30

श्रीगोंदा शहरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या बेलवंडी कोठार गावात भरदुपारी घरफोडीची घटना घडली.

Bharwadisa Gharfodi in Belvundi Bazar in Shrigonda taluka | श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठारमध्ये भरदिवसा घरफोडी

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठारमध्ये भरदिवसा घरफोडी

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या बेलवंडी कोठार गावात भरदुपारी घरफोडीची घटना घडली. मोहन चंद्रकांत चेमटे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला केला. ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, मोहन व त्यांची पत्नी  ऊसाच्या रसाचे दुकानावर जात असतात. आज दोघेही घर बंद करून गेले होते. दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत पेट्यांची उचका-पाचक केली. साडे चार तोळे सोने आणि सव्वा लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळास भेट दिली.
 

Web Title: Bharwadisa Gharfodi in Belvundi Bazar in Shrigonda taluka