खबरदार... वाहने सुसाट पळवाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST2021-02-05T06:39:25+5:302021-02-05T06:39:25+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वेगमर्यादा ओलांडणाऱ्या ७७ हजार ६४८ वाहनांना महामार्ग पोलिसांनी ‘स्पीड गन’च्या माध्यमातून ७ कोटी ७६ ...

Beware ... if the vehicles run smoothly ... | खबरदार... वाहने सुसाट पळवाल तर...

खबरदार... वाहने सुसाट पळवाल तर...

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वेगमर्यादा ओलांडणाऱ्या ७७ हजार ६४८ वाहनांना महामार्ग पोलिसांनी ‘स्पीड गन’च्या माध्यमातून ७ कोटी ७६ लाख ४८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रत्येकी १ हजार रुपये असे या दंडाचे स्वरूप आहे. या स्मार्ट पद्धतीमुळे सुसाट वाहने पळविणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.

महामार्गावर सुसाट चालणारी वाहने अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. या बेशिस्त वाहनचालकांना आता इंटरसेप्टर व्हॅनच्या माध्यमातून ऑनलाइन दंड करून शिस्त लावली जात आहे. जिल्ह्यात महामार्ग पोलिसांच्या केडगावसह बाभळेश्वर (ता. राहाता), तीसगाव (ता. पाथर्डी), डोळसने (ता. संगमनेर) व आळेफाटा येथे पोलीस चौक्या आहेत. प्रत्येक पोलीस चौकीला स्पीड गन असलेली इंटरसेप्टर व्हॅन आहे. दीड ते दोन वर्षांपासून ही अत्याधुनिक कार्यप्रणाली कार्यन्वित झालेली आहे. याआधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून पावती फाडून दंड केला जात होता. या कारवाईदरम्यान बहुतांश वेळा वाहनचालक पोलिसांशी हुज्जत घालत होते. आता स्पीड गनच्या माध्यमातून थेट ऑनलाइन दंड केला जात आहे. यामुळे बेफाम चालणाऱ्या वाहनचालकांवर दंड करण्याचे प्रमाणही वाढले आहे.

-----------------------------------------------------------------

धावत्या वाहनांचा मोजला जातो वेग

रस्त्यावर इंटरसेप्टर व्हॅनमध्ये असलेल्या स्पीड गनच्या माध्यमातून धावत्या वाहनांचा वेग मोजला जातो. स्पीड गनला असलेले कॅमेरे एक ते दीड किलाेमीटर अंतरावरून नियम तोडणाऱ्या वाहनांचा वेध घेतात. वाहन जवळ आल्यानंतर क्रमांक नोट करून ऑनलाइन दंड पडतो. ही दंडाची रक्कम वाहनाच्या आरसी बुक खात्याला जोडली जाते. आरसी बुकला मोबाइल क्रमांक कनेक्ट असेल तर दंड झाल्याबाबत सदर वाहनमालकास मेसेज येतो.

------------------------------------------------------------------------------------

वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इंटरसेप्टर व्हॅनच्या माध्यमातून होणारी कारवाई महत्त्वपूर्ण ठरत आहे. गेल्या दीड वर्षात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. या कारवाईत असेच सातत्य राहणार आहे. स्पीड गनच्या माध्यमातून उल्लंघन करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दंड केला जात आहे.

- शशिकांत गिरी, सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस, अहमदनगर

------------------------------------------------------------

शहर वाहतूक शाखेची स्पीड गन धूळखात

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी शहर वाहतूक शाखेलाही स्पीड गन देण्यात आलेली आहे. मात्र, ही गन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांअभावी गेल्या अनेक महिन्यांपासून धूळखात पडून आहे. वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यन्वित करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत. सध्या वाहतूक शाखेतील स्पीड गन नादुरस्त असल्याचे येथील निरीक्षक विकास देवरे यांनी सांगितले.

२९ स्पीड गन

Web Title: Beware ... if the vehicles run smoothly ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.