सावधान, कोरोना वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:32+5:302021-03-06T04:20:32+5:30
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात १८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ५६४ इतकी ...

सावधान, कोरोना वाढतोय
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात १८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ५६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७० टक्के आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १,३९४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १७४, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११८ आणि अँटिजन चाचणीत ११ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८४, अकोले १९, जामखेड ६, कर्जत २, नगर ग्रामीण ३, नेवासा १, पारनेर १, पाथर्डी ९, राहुरी ५, संगमनेर ३०, श्रीगोंदा ४, कॅन्टोन्मेंट बोर्ड १०, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २३, अकोले ३, कर्जत ३, कोपरगाव ७, नगर ग्रामीण ८, नेवासा ७, पारनेर २, पाथर्डी २, राहाता १५, राहुरी ९, संगमनेर २१, शेवगाव १, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ५, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत आज ११ जण बाधित आढळून आले. नगर ग्रामीण २, पारनेर १, राहाता ४, संगमनेर २, शेवगाव १, श्रीरामपूर १, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा ७१, अकोले २, जामखेड १, कर्जत १, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ५, नेवासा १, पारनेर १६, पाथर्डी ७, राहाता १४, राहुरी ५, संगमनेर ४८, शेवगाव २, श्रीगोंदा २, श्रीरामपूर ४ आणि इतर जिल्हा ४, अशा रुग्णांचा समावेश आहे.
----------
बरे झालेली रुग्णसंख्या : ७४,५६४
उपचार सुरू असलेले रुग्ण : १,३९४
मृत्यू : १,१५२
एकूण रुग्ण संख्या : ७७,११०